Ad will apear here
Next
सप्तसूर जीवन जगण्याचे
डॉ. गजानन राणे यांनी अवघ्या ६४ पानांच्या ‘सप्तसूर जीवन जगण्याचे’ या पुस्तिकेतून अत्यंत सोप्या वाक्यांमधून रोजच्या आयुष्यातली उदाहरणं देत, आयुष्यात हमखास यशस्वी होण्याची गुरुकिल्लीच जणू वाचकांकडे सोपविली आहे... त्या पुस्तकाचा हा परिचय...
.........................
गाण्यातल्या सात सुरांवर जसं आपण पक्का ताबा मिळवून सुमधुर, श्रवणीय गाणं सादर करू शकतो, तसंच जीवनातल्या सात सुरांवरही पक्की बैठक मिळवून आपण आपलं आयुष्य एका सुंदर तालात, लयीत व्यतीत करू शकतो, असा मंत्र देणारी सात सुरांची गुरुकिल्लीच एका छोटेखानी पुस्तकाच्या रूपानं डॉ. गजानन राणे यांनी आपल्या हातात ठेवली आहे.

आपलं आयुष्य सुखी, समाधानी बनवणारे ते सात सूर कोणते? डॉ.गजानन राणे यांनी अगदी थोडक्यात आणि ‘सारेगमपधनि’ या सुरांच्या प्रत्येक अक्षरांवरून सुरू होणाऱ्या काही सोप्या शब्दांचा वापर करून ते असे मांडले आहेत -

सा - म्हणजे ‘सकारात्मकता ठेवणं, संस्कारी असणं, सवयी चांगल्या ठेवणं, सहकारानं वागणं, सुसंवाद राखणं, समाधानी असणं, सहवासात (कुटुंबीयांच्या) असणे, संबंध चांगले ठेवणं.’
रे – म्हणजे ‘रेग्युलर (सातत्य राखणं), रोल मॉडेलचं रहस्य जाणून योग्य निवड करणं, रागावर नियंत्रण ठेवणं, रेषा (मर्यादा) आखून त्या रेषेच्या नियंत्रणात राहणं.’
– म्हणजे ‘‘ग’ची बाधा होऊ न देणं, गप्पांमध्ये वेळ वाया न दवडणं, गोंधळ (वैचारिक) टाळणं, गुणवत्ता राखणं, गडबडीत निर्णय न घेणं.’
– म्हणजे ‘मधाळ बोलणं, मत मांडण्यास न घाबरणं, मनावर संयम ठेवणं, मजेत राहणं, मतभेद असले तरी मनभेद होऊ न देणं, माणुसकीनं वागणं, मेहनत करणं, मनोरंजनासाठी वेळ देणं.’  
– म्हणजे ‘परमेश्वराचे आभार मानणं, परिस्थितीसमोर हताश न होणं, परोपराकारी वृत्ती अंगी बाणवणं, परीक्षेला आत्मविश्वासानं सामोरं जाणं, पाठपुरावा करून कामं वेळेवर उरकणं.’  
– म्हणजे ‘धनाचे महत्त्व जाणून घेणं, धाडस अंगी बाळगणं, ध्यास अंगी बाळगून चांगल्या ध्येयाच्या दिशेनं पावलं टाकणं, धरसोड वृत्तीचा त्याग करणं.’
नि – म्हणजे ‘नियंत्रणात राहणं, निरीक्षणशक्ती वाढवणं, निरपराध लोकांचं संरक्षण करणं, निराशेचा त्याग करणं, निश्चयी असणं, नियोजन करणं.’
अशा अत्यंत सोप्या वाक्यांमधून अवघ्या ६४ पानांच्या पुस्तिकेत डॉ. राणे यांनी जीवनातल्या या सप्तसुरांची ओळख करून देऊन यशस्वी होण्याचं मर्म सांगितले आहे.


पुस्तक : सप्तसूर जीवन जगण्याचे
प्रकाशक : प्रा.बी.एन.खरात, समृद्धी प्रकाशन, २१४, वेरळ, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग ४१६६०८
पृष्ठे : ६४
मूल्य : १०० रुपये
संपर्क : डॉ.गजानन राणे
फोन : ९२२६१ ०९६७४
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZXHBG
Similar Posts
प्रोग्रामिंग इन ‘सी’ ‘प्रोग्रामिंग इन सी फ्रॉम नॉव्हिस टू एक्स्पर्ट’ हे महेश भावे आणि सुनील पाटेकर यांनी लिहिलेलं आटोपशीर, पण ‘सी प्रोग्रामिंग’विषयी सर्व माहिती अत्यंत सुलभतेने देणारं पुस्तक आहे. नवशिक्यांपासून तज्ज्ञांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा या पुस्तकाविषयी...
अंतरंग युवा मनाचे एकीकडे शिक्षण आणि नोकरीचं व्यस्त गणित असताना रोजच्या आयुष्यात युवकांना भेडसावणाऱ्या इतर समस्या म्हणजे ‘जनरेशन गॅप’मुळे उद्भवणारे कलह, प्रेमप्रकरणं आणि त्यातून प्रसंगी वाट्याला येणारं नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे नात्यांमध्ये येत चाललेला दुरावा आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या
परिवर्तन तुमच्याच हाती... देशातील परिस्थितीत परिवर्तन कसे घडायला हवे आणि आपण नागरिक ते कसे घडवून आणू शकतो, हा विचार इंजिनीअर देवेंद्रसिंग वधवा यांनी ‘परिवर्तन तुमच्याच हाती’ या पुस्तकातून मांडला आहे. त्या पुस्तकाविषयी...
आमंत्रण स्वर्गाचे मानवाच्या कल्याणासाठी प्रत्येकाने ‘स्वतःमधली अ-प्रगल्भता, अहंकार आणि अज्ञान झटकून टाकून आध्यात्मिकतेच्या वाटेवर चालायला सुरुवात केली, की आत्माविष्कार साध्य होईल आणि तोच आपल्याला स्वर्गाची वाट दाखवेल’ असे ठाम प्रतिपादन करणारे ‘आमंत्रण स्वर्गाचे’ हे पुस्तक लेखक विशाल चिप्कर यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language